हेमंत आठल्ये

Archive for the ‘म. टा. खास’ Category

सांगली-मिरजेत ‘शांत’ अशांतता

In बातमी, म. टा. खास on सप्टेंबर 5, 2009 at 10:33 pm

म. टा. खास– गणेशोत्सवातील ‘अफझलखानाचा वधा’चा देखावा असलेल्या कमानीच्या उभारणीवरून उद्भवलेल्या मिरजेतील हिंदू-मुस्लिम जातीय दंगलीचे लोण आता सांगली जिल्हा व आजूबाजूच्या जिल्ह्यांतही पसरत आहे. बंद, दहशत, भीती व दंगलग्रस्त अशांत परिस्थितीमुळे सांगली-मिरजेतील सामान्य जनता तीन-चार दिवस जीव मुठीत घेऊन जगताना दिसत असून, सर्वत्र अघोषित संचारबंदी सुरू असल्याप्रमाणे कडकडीत ‘बंद’चे येथे वातावरण आहे. Read the rest of this entry »

पुण्यात स्वाइन फ्लूचे ३३ बळी

In बातमी, म. टा. खास on सप्टेंबर 3, 2009 at 12:20 सकाळी

म. टा. खास– स्वाइन फ्लूने ५३ वर्षाच्या राजेंद्र डाके यांचा पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या मृत्यूमुळे स्वाइन फ्लूच्या पुण्यातील बळींची संख्या ३३ झाली आहे. Read the rest of this entry »

… तर गोदरेजची उत्पादने विकू देणार नाही

In बातमी, म. टा. खास on सप्टेंबर 1, 2009 at 4:58 pm

म. टा. खास– ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार युनियनमध्ये प्रवेश करणाऱ्या गोदरेजच्या ज्या कामगारांची कंपनीने यूपी-बिहारमध्ये बदली केली आहे, ती ताबडतोब थांबवा नाही तर गोदरेजचे एकही उत्पादन विकू देणार नाही’, असा स्पष्ट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी दिला. ‘हिंमत असेल तर, गोदरेज कंपनीने ताकद आजमावून बघावी’, असे जाहीर आव्हानही राज यांनी दिले आहे. Read the rest of this entry »

‘ठणठणीत’ ठाकरेंची ‘खणखणीत’ मुलाखत

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 28, 2009 at 12:35 pm

म. टा. खास– एक जमाना होता… माझ्या या हाताने मोठमोठ्या राजकारण्यांना थरथर कापायला लावलं… आता मात्र तो हातच थरथर कापतोय… व्यंगचित्रकलेचा हात गेला माझा… आता मूडच लागत नाही… अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मनातील वेदना आज बोलून दाखवली. पण जर माझा हात स्थिरावला तर पहिला फटका तुम्हालाच मारेन… अशी खास ठाकरे स्टाईल चपराकही त्यांनी यावेळी लगावली. Read the rest of this entry »

रायपूरमध्ये मराठी मुलांना मारहाण

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 27, 2009 at 12:11 सकाळी

म. टा. खास– महाराष्ट्रातून इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या परीक्षेसाठी छत्तीसगडमध्ये रायपूर येथे गेलेल्या ५० मराठी मुलांना स्थानिक मुलांनी मारहाण केली. परीक्षा केंद्रावरुन मराठी मुलांना हाकलण्यात आले. विरोधाला न जुमानता परीक्षा देण्यासाठी वर्गात जाणा-या मुलांना धमक्या देण्यात आल्या. परीक्षेसाठी आलेल्या काही मराठी मुलांना पकडून जबरदस्तीने रिक्षात बसवण्यात आले. त्यांची हॉल तिकिटं फाडण्यात आली. तसेच त्यांना मिळेल ती गाडी पकडून तुमच्या घरी चालते व्हा, असे सुनावण्यात आले. महाराष्ट्रात राहता मग आमच्याकडे परीक्षा देण्यासाठी कशाला येता, इथे कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत देण्यासाठी यायचे नाही, अशी दमबाजी करण्यात आली. Read the rest of this entry »

डिस्कव्हरी यानाचे उड्डाण पुढे ढकलले

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 26, 2009 at 1:13 pm

म. टा. खास– अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा ने डिस्कव्हरी यानाचे उड्डाण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार, मंगळवारी दुपारी होणार असलेले उड्डाण इंधन टाकीचा एक व्हॉल्व्ह बिघडल्यामुळे पुढे ढकलण्यात आले. उड्डाणाची नवी वेळ अजून जाहीर करण्यात आलेली नाही. Read the rest of this entry »

देशात स्वाइन फ्लूचे ६९ बळी

In बातमी, म. टा. खास, स्वाइन फ्लू on ऑगस्ट 25, 2009 at 12:48 सकाळी

म. टा. खास– स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराने देशात ७१ जणांचा बळी घेतला आहे. पुण्यातल्या स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या २३ झाली तर मुंबईत आतापर्यंत स्वाइन फ्लूने आठ जणांचा बळी घेतला आहे. मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पुष्पा चौधरी या गर्भवतीचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाला आहे. ठाणे येथे राहाणा-या पुष्पा यांना स्वाइन फ्लू झाल्याचे लक्षात येताच कस्तुरबामध्ये दाखल करण्यात आले होते. Read the rest of this entry »

भरसभेत विलासरावांच्या तोंडावर ‘गोमूत्र’

In म. टा. खास on ऑगस्ट 23, 2009 at 12:46 सकाळी

म. टा. खास– केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांच्या तोंडावर गोमूत्र फेकून कोल्हापूरमध्ये आज एका तरूणाने एकच खळबळ उडवून दिली. काँग्रेसच्या एका जाहीर कार्यक्रमासाठी विलासराव आले असताना, या तरूणाने व्यासपीठावर जाऊन त्यांच्या तोंडावर गोमूत्र शिंपडले. Read the rest of this entry »

पुन्हा दहशतवादी हल्ल्याची भीती

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 18, 2009 at 10:28 सकाळी

म. टा. खास– मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशात मोठा हल्ला झालेला नसला तरी पाकमधील दहशतवादी संघटना पुन्हा तशा तयारीत असल्याचे ठोस पुरावे आहेत. त्यामुळे आपल्याला कमालीचे सावध रहावे लागेल, असा इशारा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिला आहे.
Read the rest of this entry »

पुण्यात स्वाइन फ्लूचा १२ वा बळी

In बातमी, म. टा. खास, स्वाइन फ्लू on ऑगस्ट 13, 2009 at 5:28 pm

म. टा. खास– पुण्यातला स्वाइन फ्लूचा पाश आणखी आवळला जात असून गुरुवारी सायंकाळी आणखी एका महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला . यामुळे आतापर्यंत स्वाइन फ्लू बळींची संख्या पुण्यात १२ , तर देशभरात २१ झाली आहे . Read the rest of this entry »