हेमंत आठल्ये

Archive for the ‘म. टा. खास’ Category

मुंबई-बडोद्यात आणखी ‘स्वाइन’ बळी

In बातमी, म. टा. खास, स्वाइन फ्लू on ऑगस्ट 12, 2009 at 1:41 सकाळी

म. टा. खास– देशातल्या ‘ स्वाइन फ्लू ‘ च्या बळींची संख्या आता ११ झाली आहे . आज संध्याकाळी केरळमध्ये ३३ वर्षीय निस्सार यांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे . त्याआधी दुपारी मुंबईत एका महिलेनं आणि बडोद्यात एका ७ वर्षीय मुलीनं आपले प्राण गमावले . आतापर्यंत पुण्यात सर्वाधिक ५, मुंबईत २, गुजरातमध्ये २ आणि चेन्नईत १ आणि केरळमध्ये १ रुग्ण स्वाइन फ्लूची शिकार ठरला आहे. Read the rest of this entry »

पुण्यात H1N1 चा चौथा बळी

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 11, 2009 at 12:50 सकाळी

म. टा. खास– गेले दोन दिवस पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये स्वाइन फ्लूच्या H1N1 विषाणूशी नेटानं झुंज देणारे केमिस्ट संजय टिळेकर यांचा अखेर आज संध्याकाळी मृत्यू झाला. स्वाइन फ्लूमुळे झालेला पुण्यातला हा चौथा मृत्यू असून राज्यातल्या बळींची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. Read the rest of this entry »

माहिम स्टेशनात लोकलची धडक

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 10, 2009 at 12:02 सकाळी

म. टा. खास– माहिम येथे प्लॅटफॉर्म एकच्या ट्रॅकवर दोन लोकल गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात सातजण किरकोळ जखमी झाले. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. सिग्नल असल्यामुळे ट्रॅकवर बोरिवली लोकल उभी असताना मागून आलेल्या अंधेरी लोकलची धडक बसल्यामुळे अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांना भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. Read the rest of this entry »

मुंबईत ‘स्वाइन फ्लू’चा पहिला बळी, देशातला दुसरा

In म. टा. खास, स्वाइन फ्लू on ऑगस्ट 8, 2009 at 10:19 pm

म. टा. खास– संपूर्ण राज्यभर घबराट निर्माण करणा-या स्वाइन फ्लूनं पुण्यानंतर आज मुंबईत आपला दुसरा बळी घेतला. H1N1 पॉझिटिव्ह असलेल्या फमिदा पानवाला यांचं संध्याकाळी कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्या ५३ वर्षांच्या होत्या. या मृत्यूमुळे मुंबईकर चांगलेच धास्तावलेत. Read the rest of this entry »

स्वातंत्र्यदिनी घातपात करण्याचा कट

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 7, 2009 at 3:53 pm

म. टा. खास– दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुरुवारी रात्री पांढ-या सँट्रो कारमधून जात असलेल्या हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना दरियागंज भागातून अटक केली. त्यांच्या चौकशीतून स्वातंत्र्यदिनी घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असल्याचे उघड झाले आहे. Read the rest of this entry »

खासगी विमान कंपन्यांचा १८ ऑगस्टला बंद!

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 3, 2009 at 1:07 सकाळी

म. टा. खास– गेल्या वर्षभरात विमानांच्या इंधनाच्या भावात अनेक वेळा झालेली मोठी वाढ आणि सरकारकडून करांमध्ये करण्यात आलेली वाढ यातून एकंदर खर्च व तोटा आवाक्याबाहेर गेलेल्या आठ प्रमुख खासगी विमानसेवा कंपन्यांनी सरकारने आपल्याला वाचविण्यासाठी ‘बेल आउट पॅकेज’ दिले नाही तर येत्या १८ ऑगस्ट रोजी देशांतर्गत सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या मागण्यांचा विचार सरकारने केला नाहीच तर व्यवसाय बेमुदत बंद करण्याचाही इरादा या कंपन्यांनी व्यक्त केला आहे. या ८ खासगी एअरलाइन्स दररोज एक लाखाहून अधिक प्रवाशांची देशांतर्गत वाहतूक करतात. या व सरकारी विमानसेवा कंपन्यांचाही सदस्य म्हणून समावेश असलेल्या ‘फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्स’ची (‘एफआयए’) शुक्रवारी बैठक होऊन तीत हा ‘बहिष्कारा’चा निर्णय घेण्यात आला.

Read the rest of this entry »

कृत्रिम पाउस म्हणजे काय ?

In म. टा. खास on ऑगस्ट 2, 2009 at 12:05 pm

म. टा. खास– जगभरात सध्या २४ देशांमध्ये अशा प्रकारे कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू आहेत. आतापर्यंत चीनमध्ये जगातला सर्वात मोठा कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला आहे. २००८ साली बिजिंगमध्ये झालेल्या ऑलिम्पिक सामन्यांपूवीर् हवेतलं प्रदूषण कमी करण्यासाठी या शहरात कृत्रिम पाऊस पाडण्यात आला होता. चार महिन्यांच्या दुष्काळानंतर बिजिंगमध्ये फेब्रुवारी २००९मध्ये पुन्हा एकदा कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. Read the rest of this entry »

शिवसेनेने फोडला प्रचाराचा नारळ

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 1, 2009 at 11:30 pm

म. टा. खास– मुंबईत २६ नोव्हेंबरला कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद मिळाले आहेत, त्यामुळे हे हंगामी मुख्यमंत्री आहेत. ते राज्याचा विकास काहीच करु शकत नाही अशी तोफ शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी डागली. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या निवडणूक प्रचारचा नारळ फोडलाय. आज नांदेडमधून शिवसंवाद दौऱ्याचा प्रारंभ करून सेना कार्याध्यक्षांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. Read the rest of this entry »

साध्वीसह सर्व आरोपींवरचा मोक्का हटवला

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 1, 2009 at 12:08 सकाळी

म. टा. खास– मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींवरील मोक्का हटवण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. या निर्णयामुळे एटीएसला मोठा धक्का बसला आहे.मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एकूण अकरा जण अटकेत आहेत. त्यात साध्वी प्रज्ञासिंग ,लष्करी अधिकारी श्रीकांत प्रसाद पुरोहित यांचा समावेश आहे. मुंबईतील मोक्का कोर्टाने हा निर्णय दिला.

Read the rest of this entry »

सायबर वॉर

In म. टा. खास, संगणक on जुलै 31, 2009 at 2:04 सकाळी

म. टा. खास– अलिकडेच उत्तर कोरियाने दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला सायबर वॉरचं तंत्र वापरून बराच त्रास दिला होता. चीन आणि पाकिस्तानतील तज्ज्ञ सायबर वॉरच्या तंत्राचा उपयोग करून भारताला हैराण करत असल्याच्या बातम्या येतच असतात. आहे तरी काय हे सायबर वॉर? Read the rest of this entry »