हेमंत आठल्ये

Archive for the ‘संगणक’ Category

आरएसएस

In गूगल, मी, मोफत, संगणक on ऑगस्ट 20, 2009 at 12:58 सकाळी
आर एस एस

आर एस एस

आर एस एस याचे पूर्ण नाव ‘ रिअली सिंपल सिंडिकेशन’ असे आहे. याचा वापर वेब मध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. आरएसएस ला फीड या नावाने देखील ओळखले जाते. हि एक पद्धती आहे. कि ज्यात आपल्याला ब्लॉग वरील किंवा वेब साईट वरील माहिती आपल्याला हव्या त्या पद्धतीत पाहू शकतो. आरएसएस चा वापर करून तुम्ही ब्लॉग वरील किंवा वेब साईट वरील नवनवीन अद्ययावत माहिती त्या वेब साईट वर न जाता पाहू/वाचू शकता. तुम्ही हव्या त्या ब्लॉगचा किंवा वेब साईट चा अशा पद्धतीने आरएसएस बनवून ठेवू शकता. Read the rest of this entry »

Advertisements

मायक्रो ब्लॉगिंग म्हणजे काय?

In मी, मोफत, संगणक on ऑगस्ट 19, 2009 at 1:26 सकाळी

मायक्रो ब्लॉगिंग याचा अर्थ असा कि उपयोग कर्ता त्याला हवे त्यांनाच तो छायाचित्र, आवाज (ध्वनी) किंवा संक्षेपात त्याच्या बद्दल ची माहिती अथवा त्याच्या घडणार्या नव्या गोष्टींबद्दल मल्टी मिडिया, इमैल, वेब च्या साह्याने संपादित करणे. मायक्रो ब्लॉग ची कार्यपद्धती हि साधारण ब्लॉग पेक्षा वेगळी असते. एखादे एका वाक्यात किंवा दहा सेकंदाच्या विडिओ मध्ये देखील ब्लॉग बनू शकतो. Read the rest of this entry »

गूगल इंडिक ट्रसलीटेराशन

In आजची वेबसाइट, गूगल, मी, मोफत, संगणक on ऑगस्ट 17, 2009 at 12:06 सकाळी
गूगल इंडिक ट्रसलीटेराशन

गूगल इंडिक ट्रसलीटेराशन

गूगल ने आणखीन एक नवीन सुविधा निर्माण केली आहे. ती सुद्धा खास मराठी भाषिकांसाठी. आता मराठीत तुम्ही कुठलाही वेब साइट ला रिप्लाय करू शकता. ही सेवा बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, नेपाली, पंजाबी, तमिळ, तेलगु, उर्दू अशा इतरही भाषेत उपलब्ध आहे. यासाठी केवळ तुम्हाला गूगल चा एक कोड तुमच्या ब्राउजर मध्ये बुक मार्क करावा लागतो. Read the rest of this entry »

मोफत इबूक्स डाउनलोड करा

In आजची वेबसाइट, मोफत, संगणक on ऑगस्ट 2, 2009 at 2:51 सकाळी

स्क्रिब्ड.कॉम ही वेबसाइट इबूक्ससाठी प्रसिद्ध आहे. या वेबसाइट वर तुम्ही इन्टरनेट, इतिहास, अर्थ, व्यवसाय, देश, धर्म, अशा अनेक विषयाची इबूक्स वाचू शकता. आणि हवी असल्यास ती पिडीएफ, वर्ड आणि टेक्स्ट अशा विविध स्वरुपातुन डाउनलोड देखील करू शकता. तुम्हाला हवी असलेली माहिती शोधण्यासाठी साईट मधे उजव्या बाजूला सर्च चा बॉक्स दिला आहे. त्यात तुम्ही हवी ती माहिती शोधू शकता. Read the rest of this entry »

गूगल ब्लॉग सर्च

In आजची वेबसाइट, गूगल, संगणक on ऑगस्ट 1, 2009 at 2:44 सकाळी
गूगल ब्लॉग सर्च

गूगल ब्लॉग सर्च

आपण अनेक वेबसाइट गूगल सर्च इंजन द्वारे शोधतो. ज्या पद्धतीने आपण वेबसाइट चा शोध घेतो त्याच पद्धतीने जर आपणाला ब्लॉग शोधायचा असेल तर गूगल ब्लॉग सर्च चा उपयोग होऊ शकतो. कोणत्याही विषयावरील समीक्षा, प्रतिक्रिया याच्या शोधला एक उत्तम पर्याय ठरू शकतो. Read the rest of this entry »

सायबर वॉर

In म. टा. खास, संगणक on जुलै 31, 2009 at 2:04 सकाळी

म. टा. खास– अलिकडेच उत्तर कोरियाने दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला सायबर वॉरचं तंत्र वापरून बराच त्रास दिला होता. चीन आणि पाकिस्तानतील तज्ज्ञ सायबर वॉरच्या तंत्राचा उपयोग करून भारताला हैराण करत असल्याच्या बातम्या येतच असतात. आहे तरी काय हे सायबर वॉर? Read the rest of this entry »

मायक्रोसॉफ्ट-याहूची युती

In गूगल, म. टा. खास on जुलै 30, 2009 at 10:16 सकाळी

म. टा. खास– इंटरनेटचा वापर करणाऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘गुगल’ला टक्कर देण्यासाठी आयटी क्षेत्रातील ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘याहू’ या दोन बड्या कंपन्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरनेट सर्च आणि जाहिराती मिळवणे यासाठी या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन काम करणार आहेत. Read the rest of this entry »

अवास्ट अँटी व्हायरस

In आजची वेबसाइट, मी, मोफत, संगणक on जुलै 29, 2009 at 11:18 pm

आपला संगणक व्हायरस पासून सुरक्षित रहावा यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो. फायरवाल किंवा अँटी व्हायरस च्या मदतीने आपण आपला संगणक सुरक्षित ठेवतो. असाच एक अँटी व्हायरस आहे ‘अवास्ट’. हा अगदी मोफत मिळतो. याचे प्रोफेशनल आणि होम अशे दोन प्रकार आहेत. त्यापैकी होम एडिशन मोफत डाउनलोड तुम्ही अवास्ट. कॉम वरुन करू शकता. याची इन्टरनेट संरक्षण (इन्टरनेट सेक्युरिटी) चांगली असल्याने, जर तुम्ही नेट वापरत असाल तर तुम्हाला याचा चांगला फायदा होऊ शकतो. Read the rest of this entry »

ब्लॉग म्हणजे काय ?

In मी, संगणक on जुलै 23, 2009 at 12:03 सकाळी

ब्लॉग म्हणजे वेबपेज निर्मित असलेली रोजनिशी. ज्यात संपादक त्याचे विचार मुक्तहस्तपणे मांडू शकतो. मराठीत ब्लॉगला अनुदिनी असे संबोधले जाते. साधारणत: नविन लिखाण वरती आणि जून त्याखाली अशा स्वरुपाची या ब्लॉगची मांडणी असते. ब्लॉगच्या संपादकाला ब्लॉगर असे म्हटले जाते. ब्लॉगर हा कोणीही असू शकतो. व्यक्तिगत, किंवा संस्था असे कोणीही ब्लॉग बनवू शकते. Read the rest of this entry »

गूगल मून

In आजची वेबसाइट, गूगल, संगणक on जुलै 22, 2009 at 12:02 सकाळी

आता चंद्र पहा गूगल अर्थ तुम्ही बघितलीच असेल. पृथ्वीवरील अनेक गोष्टी तुम्ही पहिल्या असतील. पण कधी तुम्ही चंद्र पहिलाय?  ४० वर्षापूर्वी म्हणजेच २० जुलाई १९६९, अपोलो ११ चंद्रावर पाऊल ठेवले, मानवाने चंद्रावर पाहिले पाऊल टाकले. पृथ्वी बाहेर मानवाने जाण्याची ही पहिलीच वेळ. नील आर्मस्ट्रांगने जे पाहिले, ते तुम्हाला पहायचय का?. तर मग विचार कसला ? Read the rest of this entry »