हेमंत आठल्ये

Archive for the ‘सकाळ’ Category

इचलकरंजीत संचारबंदी

In बातमी, सकाळ on सप्टेंबर 7, 2009 at 11:04 pm

सकाळ– स्वागत कमानीवरून मिरजेत सुरू झालेल्या दंगलीचे लोण लगतच्या इंचलकरंजीमध्ये सोमवारी वेगाने पसरले. समाजकंटकांनी दिवसभरात शहरातील शेकडो दुकानांची आणि वाहनांची मोडतोड करून त्यांना आग लावली. लिंबू चौक परिसरात एका तरुणाचा तलवारीने भोसकून खून करण्यात आल्याने परिस्थिती आणखीनच तणावपूर्ण बनली. शहरात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. Read the rest of this entry »

मिरजेत प्रशासनाकडून गणपतींचे विसर्जन

In बातमी, सकाळ on सप्टेंबर 7, 2009 at 1:04 सकाळी

शहरात प्रशासनाकडून सायंकाळनंतर सार्वजनिक गणेश मडंळाच्या श्रींचे विसर्जन सुरू करण्यात आले. प्रचंड पोलिस बंदोबस्तात पंढरपूर रस्त्यावरील श्रीमंत गणेशोत्सव मंडळ आणि मंगळवार पेठेचा राजा, शिवाई गणेशोत्सव मंडळ या तीन मुख्य गणपतींचे विसर्जन प्रशासनाने महापालिकेच्या यंत्रणेद्वारे केले. संचारबंदीमुळे परिस्थिती नियंत्रणाखाली येत असल्याचे दिसताच जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त, महापालिकेचे पंचवीस कामगार, वाहने, मोठ्या मूर्ती उचलण्यासाठी क्रेन, कृष्णाघाटावर मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी विशेष यंत्रणा हा सगळा लवाजमा प्रशासनाने तयारच ठेवला होता. Read the rest of this entry »

स्वाइन फ्लूमुळे पुण्यात दोघींचा मृत्यू

In बातमी, सकाळ, स्वाइन फ्लू on ऑगस्ट 24, 2009 at 12:12 सकाळी

सकाळ– “स्वाइन फ्लू’मुळे शहरात दोन जणींचा रविवारी बळी गेला. त्यात आतापर्यंतचा सर्वांत लहान मुलीचा समावेश आहे. शहरात आत्तापर्यंत 22 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे.
“स्वाइन फ्लू’मुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यातही आत्तापर्यंत तीन जणांना यामुळे प्राण गमवावे लागले आहेत. जिल्ह्यातही या रोगाचा वेगाने प्रसार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. Read the rest of this entry »

राज्यात ग्राहकांना बसणार वीज दरवाढीचे चटके

In बातमी, सकाळ on ऑगस्ट 22, 2009 at 12:57 सकाळी

सकाळ– एकीकडे दुष्काळाचा सामना करतानाच राज्यातील सामान्य नागरिकांना आता वीज दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. राज्य वीज निर्मिती कंपनीने सादर केलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला राज्य वीज नियामक आयोगाने शुक्रवारी मंजुरी दिली.
दरवाढीनंतर घरगुती ग्राहकांसाठी प्रति युनिट विजेचा दर पुढीलप्रमाणे राहणार आहे.
० ते १०० युनिटसाठी २.३५ रुपये
१०१ ते ३०० युनिटसाठी ४.२५ रुपये Read the rest of this entry »

स्वाइन फ्लूची साथ अजून आटोक्‍यात नाही – शर्वरी गोखले

In बातमी, सकाळ, स्वाइन फ्लू on ऑगस्ट 16, 2009 at 3:01 सकाळी

सकाळ – राज्यात स्वाइन फ्लूची साथ अजून आटोक्‍यात आली नसल्याचे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव शर्वरी गोखले यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यात शुक्रवारी सकाळपर्यंत ६९ रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये पुण्यातील ११ रुग्णांचा समावेश आहे. स्वाइन फ्लूवर उपचारांसाठी आता राज्यातील २२ खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबईतील ११ खासगी रुग्णांलयांमध्ये ११० खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत. पुण्यातील केईएम रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांवर उपचारांसाठी सहा आणि स्वाइन फ्लूग्रस्त रुग्णांसाठी तीन खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. याचप्रमाणे भारती हॉस्पिटलमध्ये १२ अधिक १० आणि शेठ रामदास शहा रुग्णालयामध्ये १६ अधिक पाच अशा एकूण ४३ खाटांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना टॅमिफ्लूच्या गोळ्या मोफत देण्यात येतील. मात्र, रुग्णालयाचा इतर खर्च संबंधित रुग्णांना करायचे असल्याचेही गोखले यांनी स्पष्ट केले. Read the rest of this entry »

पुण्यात आढळले स्वाइन फ्लूचे ४६ नवे रुग्ण

In सकाळ, स्वाइन फ्लू on ऑगस्ट 8, 2009 at 10:24 pm

सकाळ– पुण्यातील शाळानंतर आता महाविद्यालयांमध्येही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स. प. महाविद्यालयातही एका विद्यार्थ्याला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून स. प. महाविद्यालयाने येत्या १६ ऑगस्टपर्यंत सुटी जाहीर केली आहे. आयएलएस विधी महाविद्यालय आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या दोन महाविद्यालयांनी फक्त खबरदारी म्हणून महाविद्यालये तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Read the rest of this entry »

कसाबचे घुमजाव; कबुलीजबाब देणार नाही

In सकाळ on ऑगस्ट 7, 2009 at 10:38 pm

सकाळ– मुंबईवरील हल्ल्यात पकडलेला दहशतवादी अजमल अमीर कसाबने शुक्रवारी  सकाळी  आपल्यावरील सर्व आरोप मान्य असल्याचे न्यायालयात सांगितले. मात्र, अल्पावधीतच घुमजाव करीत त्याने नव्याने कोणताही कबुलीजबाब देणार नसल्याचे न्यायालयापुढे सांगितले. कसाबच्या या घुमजावमुळे त्याच्यावरील खटल्याच्या सुनावणी सुरू राहणार आहे.

Read the rest of this entry »

‘पुणे फेस्टिव्हल’ २८ ते ३० ऑगस्टदरम्यान होणार

In सकाळ on ऑगस्ट 2, 2009 at 2:59 सकाळी

सकाळ– पुणेकरांचे खास आकर्षण असलेला भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे ‘पुणे फेस्टिव्हल’ २८ ऑगस्टपासून सुरू होत आहे. अनेकविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या ‘फेस्टिव्हल’मध्ये पाहायला मिळणार आहे. सोहळ्याचे २१ वे वर्ष आहे. पुण्याचे खासदार आणि ‘पुणे फेस्टिव्हल’चे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. Read the rest of this entry »

‘स्वाईन फ्लू’चे उगमस्थान

In बातमी, सकाळ, स्वाइन फ्लू on जुलै 31, 2009 at 10:11 सकाळी

सकाळ– ‘स्वाईन फ्लू’चा (एच १ एन १) प्रादुर्भाव वाढत असून, त्याच्या जगभरातील रुग्णांची संख्या सव्वा लाखाच्या घरात गेल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. भारतामध्येही त्याचा संसर्ग झाला आहे. पुण्यात काही शाळांमध्ये त्याचे रुग्ण सापडले आहेत. आपल्याकडील “स्वाईन फ्लू’चा विषाणू तुलनेने सौम्य असल्याचे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. घाबरून न जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. सध्याच्या ‘स्वाईन फ्लू’च्या संसर्गाचा उगम अमेरिकेतून आलेल्या व्यक्तीपासून दिसतो आहे. तेथे या रोगाचा संसर्ग अधिक आहे. Read the rest of this entry »

पुण्यात नऊ ऑगस्टला रिक्षा बंद

In सकाळ on जुलै 27, 2009 at 10:30 pm

सकाळ– पेट्रोल दरात वाढ झाल्याने रिक्षा भाड्याच्या दरात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी येत्या नऊ ऑगस्टला शहर व पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय रिक्षा पंचायतने घेतला आहे. विविध मागण्यांसाठी मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होणार असल्याचे रिक्षा पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी कळविले आहे. Read the rest of this entry »