हेमंत आठल्ये

Posts Tagged ‘बातमी’

पुण्यात स्वाइन फ्लूचा १२ वा बळी

In बातमी, म. टा. खास, स्वाइन फ्लू on ऑगस्ट 13, 2009 at 5:28 pm

म. टा. खास– पुण्यातला स्वाइन फ्लूचा पाश आणखी आवळला जात असून गुरुवारी सायंकाळी आणखी एका महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला . यामुळे आतापर्यंत स्वाइन फ्लू बळींची संख्या पुण्यात १२ , तर देशभरात २१ झाली आहे . Read the rest of this entry »

मुंबई-बडोद्यात आणखी ‘स्वाइन’ बळी

In बातमी, म. टा. खास, स्वाइन फ्लू on ऑगस्ट 12, 2009 at 1:41 सकाळी

म. टा. खास– देशातल्या ‘ स्वाइन फ्लू ‘ च्या बळींची संख्या आता ११ झाली आहे . आज संध्याकाळी केरळमध्ये ३३ वर्षीय निस्सार यांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे . त्याआधी दुपारी मुंबईत एका महिलेनं आणि बडोद्यात एका ७ वर्षीय मुलीनं आपले प्राण गमावले . आतापर्यंत पुण्यात सर्वाधिक ५, मुंबईत २, गुजरातमध्ये २ आणि चेन्नईत १ आणि केरळमध्ये १ रुग्ण स्वाइन फ्लूची शिकार ठरला आहे. Read the rest of this entry »

पुण्यात H1N1 चा चौथा बळी

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 11, 2009 at 12:50 सकाळी

म. टा. खास– गेले दोन दिवस पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये स्वाइन फ्लूच्या H1N1 विषाणूशी नेटानं झुंज देणारे केमिस्ट संजय टिळेकर यांचा अखेर आज संध्याकाळी मृत्यू झाला. स्वाइन फ्लूमुळे झालेला पुण्यातला हा चौथा मृत्यू असून राज्यातल्या बळींची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. Read the rest of this entry »

माहिम स्टेशनात लोकलची धडक

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 10, 2009 at 12:02 सकाळी

म. टा. खास– माहिम येथे प्लॅटफॉर्म एकच्या ट्रॅकवर दोन लोकल गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात सातजण किरकोळ जखमी झाले. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. सिग्नल असल्यामुळे ट्रॅकवर बोरिवली लोकल उभी असताना मागून आलेल्या अंधेरी लोकलची धडक बसल्यामुळे अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांना भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. Read the rest of this entry »

पुण्यात आढळले स्वाइन फ्लूचे ४६ नवे रुग्ण

In सकाळ, स्वाइन फ्लू on ऑगस्ट 8, 2009 at 10:24 pm

सकाळ– पुण्यातील शाळानंतर आता महाविद्यालयांमध्येही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स. प. महाविद्यालयातही एका विद्यार्थ्याला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून स. प. महाविद्यालयाने येत्या १६ ऑगस्टपर्यंत सुटी जाहीर केली आहे. आयएलएस विधी महाविद्यालय आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या दोन महाविद्यालयांनी फक्त खबरदारी म्हणून महाविद्यालये तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Read the rest of this entry »

मुंबईत ‘स्वाइन फ्लू’चा पहिला बळी, देशातला दुसरा

In म. टा. खास, स्वाइन फ्लू on ऑगस्ट 8, 2009 at 10:19 pm

म. टा. खास– संपूर्ण राज्यभर घबराट निर्माण करणा-या स्वाइन फ्लूनं पुण्यानंतर आज मुंबईत आपला दुसरा बळी घेतला. H1N1 पॉझिटिव्ह असलेल्या फमिदा पानवाला यांचं संध्याकाळी कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्या ५३ वर्षांच्या होत्या. या मृत्यूमुळे मुंबईकर चांगलेच धास्तावलेत. Read the rest of this entry »

कसाबचे घुमजाव; कबुलीजबाब देणार नाही

In सकाळ on ऑगस्ट 7, 2009 at 10:38 pm

सकाळ– मुंबईवरील हल्ल्यात पकडलेला दहशतवादी अजमल अमीर कसाबने शुक्रवारी  सकाळी  आपल्यावरील सर्व आरोप मान्य असल्याचे न्यायालयात सांगितले. मात्र, अल्पावधीतच घुमजाव करीत त्याने नव्याने कोणताही कबुलीजबाब देणार नसल्याचे न्यायालयापुढे सांगितले. कसाबच्या या घुमजावमुळे त्याच्यावरील खटल्याच्या सुनावणी सुरू राहणार आहे.

Read the rest of this entry »

स्वातंत्र्यदिनी घातपात करण्याचा कट

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 7, 2009 at 3:53 pm

म. टा. खास– दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुरुवारी रात्री पांढ-या सँट्रो कारमधून जात असलेल्या हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना दरियागंज भागातून अटक केली. त्यांच्या चौकशीतून स्वातंत्र्यदिनी घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असल्याचे उघड झाले आहे. Read the rest of this entry »

कृत्रिम पाउस म्हणजे काय ?

In म. टा. खास on ऑगस्ट 2, 2009 at 12:05 pm

म. टा. खास– जगभरात सध्या २४ देशांमध्ये अशा प्रकारे कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू आहेत. आतापर्यंत चीनमध्ये जगातला सर्वात मोठा कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला आहे. २००८ साली बिजिंगमध्ये झालेल्या ऑलिम्पिक सामन्यांपूवीर् हवेतलं प्रदूषण कमी करण्यासाठी या शहरात कृत्रिम पाऊस पाडण्यात आला होता. चार महिन्यांच्या दुष्काळानंतर बिजिंगमध्ये फेब्रुवारी २००९मध्ये पुन्हा एकदा कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. Read the rest of this entry »

‘पुणे फेस्टिव्हल’ २८ ते ३० ऑगस्टदरम्यान होणार

In सकाळ on ऑगस्ट 2, 2009 at 2:59 सकाळी

सकाळ– पुणेकरांचे खास आकर्षण असलेला भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे ‘पुणे फेस्टिव्हल’ २८ ऑगस्टपासून सुरू होत आहे. अनेकविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या ‘फेस्टिव्हल’मध्ये पाहायला मिळणार आहे. सोहळ्याचे २१ वे वर्ष आहे. पुण्याचे खासदार आणि ‘पुणे फेस्टिव्हल’चे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. Read the rest of this entry »