हेमंत आठल्ये

Posts Tagged ‘मुख्यमंत्री अशोक चव्हाण’

मुंबईत ‘स्वाइन फ्लू’चा पहिला बळी, देशातला दुसरा

In म. टा. खास, स्वाइन फ्लू on ऑगस्ट 8, 2009 at 10:19 pm

म. टा. खास– संपूर्ण राज्यभर घबराट निर्माण करणा-या स्वाइन फ्लूनं पुण्यानंतर आज मुंबईत आपला दुसरा बळी घेतला. H1N1 पॉझिटिव्ह असलेल्या फमिदा पानवाला यांचं संध्याकाळी कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्या ५३ वर्षांच्या होत्या. या मृत्यूमुळे मुंबईकर चांगलेच धास्तावलेत. Read the rest of this entry »

यवतमाळ जिल्ह्यामध्ये सिमीच्या गुप्त हालचाली

In बातमी, सकाळ on जुलै 23, 2009 at 5:57 pm

सकाळ– यवतमाळ जिल्ह्यात सिमीच्या कार्यकर्त्यांच्या गुप्त हालचालींत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, केवळ राजकीय स्वार्थासाठी राजकीय नेत्यांनी पोलिस विभागाचे हात बांधल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळेच सिमी कार्यकर्ते व त्यांच्या समर्थकात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुसद येथील दंगल ही त्याचाच परिपाक म्हणून असल्याचे जनमानसांतून बोलले जात आहे. Read the rest of this entry »

उत्तर महाराष्ट्रासाठी ६५०९ कोटींचे पॅकेज

In बातमी, सकाळ on जुलै 23, 2009 at 12:17 सकाळी

सकाळ– उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी सहा हजार ५०९ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक बुधवारी नाशिकमध्ये झाली. त्यामध्ये या पॅकेजची घोषणा करण्यात आली. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर नाशिकच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. जाहीर करण्यात आलेल्या एकूण पॅकेजपैकी २००९-१० या आर्थिक वर्षात दोन हजार ८५ कोटी रुपये, २०१०-११ या आर्थिक वर्षात दोन हजार १७९ कोटी रुपये आणि २०११-१२ या आर्थिक वर्षात दोन हजार ७४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. Read the rest of this entry »

राज्य सरकारच्या नामकरणाने नवा वाद

In म. टा. खास on जुलै 9, 2009 at 5:31 सकाळी

म. टा. खास – वांदे-वरळी सी लिंकला राजीव गांधी यांचे नाव दिल्यावरून निर्माण झालेला वाद कायम असताना, सात वर्षांपूवीर् पूर्ण होऊन प्रत्यक्ष सुरू झालेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेला दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे नाव देऊन राज्य सरकारने नव्या वादाला तोंड फोडले आहे.
Read the rest of this entry »

अनर्थ संकल्प

In मी on जुलै 7, 2009 at 5:28 pm

कालच आपल्या देशाचा अर्थ संकल्प सादर झाला. आता त्यात काय हवे आणि काय नको, हे संगण्या इतपत मी शहाना नाही. बर्‍याच वृत्तपत्रांच्या मते हा अर्थ संकल्प ना चांगला ना वाईट. प्रणव साहेबांनी केलेल्या कथ्याकुतिला मी अपमान करणार नाही. पण मला हे काळत नाही की आपली देशाची परिस्थिती नसताना, आपण नेहमी एवढा खर्च का करतो?. मला फक़त असे म्हणायचे आहे की आपण कोणताच खर्च काही हजार कोटीत का करतो?. साधा पूल जरी बांधायचा असेल तरी काही शे कोटी. Read the rest of this entry »

तक्रारींच्या ई-मेलवर तातडीने कार्यवाही करा

In बातमी, सकाळ on जून 27, 2009 at 5:47 pm

सकाळ – आपल्या विविध तक्रारी त्वरित मार्गी लागाव्यात म्हणून नागरिक ई-मेलद्वारे संपर्क साधतात. या ई-मेलवर विभाग व संबंधित सचिवांनी तत्काळ कार्यवाही करावी, असा आदेश मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे. वर्षा येथे काल सायंकाळी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर अधिक कार्यक्षमतेने करण्याबाबत सूचना दिल्या. केवळ मुंबई व महाराष्ट्रातूनच नव्हे तर अगदी विदेशातूनही लोक विविध तक्रारी व निवेदने ई-मेलद्वारे पाठवितात. जनतेशी थेट संवाद साधता यावा यासाठी इंटरनेटचे माध्यम अधिक उपयुक्त असल्याने मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सूत्रे स्वीकारल्यानंतर आपला ई-मेल आयडी जाहीर केला होता. Read the rest of this entry »