हेमंत आठल्ये

Posts Tagged ‘विशाल भारद्वाज’

मी मराठी शिकतेय – प्रियांका चोप्रा

In बातमी, म. टा. खास on जुलै 19, 2009 at 11:36 pm

म. टा. खास – लवकरच माझा नवा सिनेमा येतोय, ‘कमिने’. विशाल भारद्वाजच्या या अगदी वेगळ्या सिनेमात मी एका मराठी मुलीचीच भूमिका साकारलीय. ती भूमिका रिअॅलस्टिक वाटण्यासाठी सिनेमातले काही डायलॉग्ज मराठी असणं आवश्यक होतं. माझे सगळे डायलॉग्ज मीच बोलणार, असा माझा आग्रह होता. मग माझा अभ्यास घ्यायला एक मराठी शिक्षक नेमण्यात आला. तो रोज येऊन मला मराठीचं व्याकरण, वाक्यरचना वगैरे शिकवायचा. त्यामुळे माझ्या स्वत:च्या आवाजात मी माझे डायलॉग्ज सिनेमात बोललेय. खूप गंमत आली. शुटिंग दरम्यान अमोल गुप्तेंनीही मला मराठी बोलायला आणि साधारण मराठमोळ्या गोष्टी समजवून द्यायला खूप मदत केली. ‘कमिने’च्या निमित्ताने मी एका मराठी मुलीचं आयुष्य खूप जवळून अनुभवलंय, असंच म्हणायला.