हेमंत आठल्ये

Posts Tagged ‘शासकीय प्रकल्पांना’

‘अरिहंत पाणबुडी’: शस्त्रसज्जतेचा कळस !

In बातमी, म. टा. खास on जुलै 28, 2009 at 4:26 pm

म. टा. खास– २६ जुलै रोजी ‘ आयएनएस अरिहंत ‘ ही देशांतर्गत विकसित केलेली आण्विकपाणबुडी भारतीय नौदलात सामीलझाली अशाप्रकारे भारताने संरक्षणक्षेत्रात एक महत्वपूर्ण टप्पा पार केलाआहे . ‘ अरिहंत ‘ पाणबुडीचे वैशिष्ट्य म्हणजे आण्विक इंधनावर चालणारीही भारताची पहिली पाणबुडी आहे हजार टन वजनाची ही पाणबुडी ११०मीटर लांब आणि ११ मीटर रुंद आहे . ‘ अरिहंत ‘ वर १०० खलाशी आणि सैनिक राहू शकतात आणि ती एकाचवेळी ९० दिवसापर्यंत कार्यरत राहू शकते . ‘ अरिहंत ‘ ची मारक क्षमता ७००किलोमीटर एवढी आहे आण्विक इंधनावर चालणारी पाणबुडी असणारा भारत हाजगातला सहावा देश झाला आहे . Read the rest of this entry »

उत्तर महाराष्ट्रासाठी ६५०९ कोटींचे पॅकेज

In बातमी, सकाळ on जुलै 23, 2009 at 12:17 सकाळी

सकाळ– उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी सहा हजार ५०९ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक बुधवारी नाशिकमध्ये झाली. त्यामध्ये या पॅकेजची घोषणा करण्यात आली. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर नाशिकच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. जाहीर करण्यात आलेल्या एकूण पॅकेजपैकी २००९-१० या आर्थिक वर्षात दोन हजार ८५ कोटी रुपये, २०१०-११ या आर्थिक वर्षात दोन हजार १७९ कोटी रुपये आणि २०११-१२ या आर्थिक वर्षात दोन हजार ७४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. Read the rest of this entry »

डॉक्टरांचा संप अखेर मागे; ७ हजारांची वाढ

In बातमी, म. टा. खास on जुलै 14, 2009 at 10:24 pm

म. टा. खास – विद्यावेतनामध्ये सात हजार रुपयांची वाढ पदरात पाडून घेतल्यानंतर आज अखेर निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेला संप मागे घेतला. २००७ पासूनची थकबाकीही डॉक्टरांना मिळणार असून त्यांच्यावरील आतापर्यंतची कारवाई मागे घेण्यात आली आहे.

विद्यावेतनवाढीसह अन्य ११ मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता. गेल्या मंगळवारपासून राज्यातील १४ महाविद्यालयातील साडेचार हजार निवासी डॉक्टरांपैकी ३१४८ डॉक्टर संपावर गेले होते. परिणामी आठवडाभरापासून रुग्णांचे प्रचंड हाल सुरु होते. विशेषतः पालिका व सरकारी हॉस्पिटलमधील रुग्णसेवा पार कोलमडली होती. संपकरी डॉक्टरांची पदव्युत्तर पदवीची नोंदणी रद्द केल्यानंतर तसेच कामावरुन काढून टाकल्यानंतरही डॉक्टरांचा संप सुरुच होता. Read the rest of this entry »

राज्य सरकारच्या नामकरणाने नवा वाद

In म. टा. खास on जुलै 9, 2009 at 5:31 सकाळी

म. टा. खास – वांदे-वरळी सी लिंकला राजीव गांधी यांचे नाव दिल्यावरून निर्माण झालेला वाद कायम असताना, सात वर्षांपूवीर् पूर्ण होऊन प्रत्यक्ष सुरू झालेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेला दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे नाव देऊन राज्य सरकारने नव्या वादाला तोंड फोडले आहे.
Read the rest of this entry »

अनर्थ संकल्प

In मी on जुलै 7, 2009 at 5:28 pm

कालच आपल्या देशाचा अर्थ संकल्प सादर झाला. आता त्यात काय हवे आणि काय नको, हे संगण्या इतपत मी शहाना नाही. बर्‍याच वृत्तपत्रांच्या मते हा अर्थ संकल्प ना चांगला ना वाईट. प्रणव साहेबांनी केलेल्या कथ्याकुतिला मी अपमान करणार नाही. पण मला हे काळत नाही की आपली देशाची परिस्थिती नसताना, आपण नेहमी एवढा खर्च का करतो?. मला फक़त असे म्हणायचे आहे की आपण कोणताच खर्च काही हजार कोटीत का करतो?. साधा पूल जरी बांधायचा असेल तरी काही शे कोटी. Read the rest of this entry »

सागरात ‘मराठी’ अस्मिता बुडालीः ठाकरे

In म. टा. खास on जुलै 2, 2009 at 6:13 pm

म. टा. खास – वांद्रे वरळी सी-लिंकला राजीव गांधी यांचे नाव द्यावे, अशी सूचना केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडून करण्यात  आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यावर तोफ डागली आहे, बारामतीकरांनी अशी भूमिका घेऊन वांद्रे-वरळीच्या सागरात ‘ मराठी अस्मिता बुडावली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात बाळासाहेबांनी ही टीका केली आहे. राज्याराज्यांत शासकीय प्रकल्पांनाही नेहरू-गांधी खानदानांची नावे आहेत. जणू देशाचा सातबारा यांच्याच नावाने केलाय, अशी तोफही बाळासाहेबांनी डागली आहे. Read the rest of this entry »