हेमंत आठल्ये

Posts Tagged ‘शिवसेना’

… तर गोदरेजची उत्पादने विकू देणार नाही

In बातमी, म. टा. खास on सप्टेंबर 1, 2009 at 4:58 pm

म. टा. खास– ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार युनियनमध्ये प्रवेश करणाऱ्या गोदरेजच्या ज्या कामगारांची कंपनीने यूपी-बिहारमध्ये बदली केली आहे, ती ताबडतोब थांबवा नाही तर गोदरेजचे एकही उत्पादन विकू देणार नाही’, असा स्पष्ट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी दिला. ‘हिंमत असेल तर, गोदरेज कंपनीने ताकद आजमावून बघावी’, असे जाहीर आव्हानही राज यांनी दिले आहे. Read the rest of this entry »

‘ठणठणीत’ ठाकरेंची ‘खणखणीत’ मुलाखत

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 28, 2009 at 12:35 pm

म. टा. खास– एक जमाना होता… माझ्या या हाताने मोठमोठ्या राजकारण्यांना थरथर कापायला लावलं… आता मात्र तो हातच थरथर कापतोय… व्यंगचित्रकलेचा हात गेला माझा… आता मूडच लागत नाही… अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मनातील वेदना आज बोलून दाखवली. पण जर माझा हात स्थिरावला तर पहिला फटका तुम्हालाच मारेन… अशी खास ठाकरे स्टाईल चपराकही त्यांनी यावेळी लगावली. Read the rest of this entry »

मनसेत ‘मूषक राज’, शिवसेनेत ‘घुशी’

In बातमी, म. टा. खास on जुलै 30, 2009 at 3:33 pm

म. टा. खास– मराठीच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात सुरु झालेल्या वादाचे पर्यवसान आता शब्दशः रॅट रेस मध्ये झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मूषकराज अशी संभावना शिवसेनेने केली असून, शिवसेनेमध्ये बिनशेपटाच्या घुशी वाढल्या असल्याचा प्रतिटोला मनसेने हाणला आहे. Read the rest of this entry »

मनसेविरुद्ध षडयंत्र!

In बातमी, म. टा. खास on जुलै 29, 2009 at 10:02 सकाळी

म. टा. खास– इथे महिला सुरक्षित नाहीत, कार्यकर्ते बलात्कार करतात, असे काहीजण म्हणतात. बलात्कार करा, असा मी काही पक्षादेश काढलेला नाही. एखाद्या कार्यर्कत्याचे डोके फिरले आणि त्याने बलात्कार केला, तर कुठलाच पक्ष काहीच करू शकत नाही. Read the rest of this entry »

सागरात ‘मराठी’ अस्मिता बुडालीः ठाकरे

In म. टा. खास on जुलै 2, 2009 at 6:13 pm

म. टा. खास – वांद्रे वरळी सी-लिंकला राजीव गांधी यांचे नाव द्यावे, अशी सूचना केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडून करण्यात  आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यावर तोफ डागली आहे, बारामतीकरांनी अशी भूमिका घेऊन वांद्रे-वरळीच्या सागरात ‘ मराठी अस्मिता बुडावली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात बाळासाहेबांनी ही टीका केली आहे. राज्याराज्यांत शासकीय प्रकल्पांनाही नेहरू-गांधी खानदानांची नावे आहेत. जणू देशाचा सातबारा यांच्याच नावाने केलाय, अशी तोफही बाळासाहेबांनी डागली आहे. Read the rest of this entry »