हेमंत आठल्ये

Posts Tagged ‘सकाळ’

कसाबचे घुमजाव; कबुलीजबाब देणार नाही

In सकाळ on ऑगस्ट 7, 2009 at 10:38 pm

सकाळ– मुंबईवरील हल्ल्यात पकडलेला दहशतवादी अजमल अमीर कसाबने शुक्रवारी  सकाळी  आपल्यावरील सर्व आरोप मान्य असल्याचे न्यायालयात सांगितले. मात्र, अल्पावधीतच घुमजाव करीत त्याने नव्याने कोणताही कबुलीजबाब देणार नसल्याचे न्यायालयापुढे सांगितले. कसाबच्या या घुमजावमुळे त्याच्यावरील खटल्याच्या सुनावणी सुरू राहणार आहे.

Read the rest of this entry »

‘पुणे फेस्टिव्हल’ २८ ते ३० ऑगस्टदरम्यान होणार

In सकाळ on ऑगस्ट 2, 2009 at 2:59 सकाळी

सकाळ– पुणेकरांचे खास आकर्षण असलेला भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे ‘पुणे फेस्टिव्हल’ २८ ऑगस्टपासून सुरू होत आहे. अनेकविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या ‘फेस्टिव्हल’मध्ये पाहायला मिळणार आहे. सोहळ्याचे २१ वे वर्ष आहे. पुण्याचे खासदार आणि ‘पुणे फेस्टिव्हल’चे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. Read the rest of this entry »

‘अभिनव’मधील आणखी एकाला ‘स्वाइन फ्लू’

In सकाळ on जुलै 22, 2009 at 12:09 pm

सकाळ- पुणे शहरात मंगळवारी “स्वाइन फ्लू’चा आणखी एक रुग्ण सापडला. कर्वे रस्त्यावरील अभिनव विद्यालयातील (इंग्रजी माध्यम) ती आठवी इयत्तेतील मुलगी असून, तिच्यावर महापालिकेच्या डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे या विद्यालयातील “स्वाइन फ्लू’ची लागण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १५ झाली आहे.

Read the rest of this entry »

तुम्ही किती टक्के मराठी आहात?

In मी on जुलै 11, 2009 at 6:53 pm

आपण नेहमीच मराठी भाषा आणि मराठी लोकांवर होणार्या अन्यायावर खुप आत्मियतेने बोलतो. कधी कधी वाद पण घालतो. परप्रांतीयानि महाराष्ट्रात मराठीत बोलायला पाहिजे असे आपण नेहमी म्हणतो. पण आपण स्वत किती मराठीचा दैनंदिन जीवनात किती वापर करतो. याचा कधी विचार केला आहे का? खाली दिलेल्या प्रश्नाची उत्तरे देऊन स्वतच स्वताला तपासा. प्रत्येक प्रश्नाला पाच गुण आहेत. उत्तरे व् त्यांच्या उत्तराना किती गुण आहे ते प्रश्नाच्या खाली दिलेले आहेत. पहा तुम्ही किती टक्के मराठी आहात.

तक्रारींच्या ई-मेलवर तातडीने कार्यवाही करा

In बातमी, सकाळ on जून 27, 2009 at 5:47 pm

सकाळ – आपल्या विविध तक्रारी त्वरित मार्गी लागाव्यात म्हणून नागरिक ई-मेलद्वारे संपर्क साधतात. या ई-मेलवर विभाग व संबंधित सचिवांनी तत्काळ कार्यवाही करावी, असा आदेश मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे. वर्षा येथे काल सायंकाळी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर अधिक कार्यक्षमतेने करण्याबाबत सूचना दिल्या. केवळ मुंबई व महाराष्ट्रातूनच नव्हे तर अगदी विदेशातूनही लोक विविध तक्रारी व निवेदने ई-मेलद्वारे पाठवितात. जनतेशी थेट संवाद साधता यावा यासाठी इंटरनेटचे माध्यम अधिक उपयुक्त असल्याने मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सूत्रे स्वीकारल्यानंतर आपला ई-मेल आयडी जाहीर केला होता. Read the rest of this entry »