हेमंत आठल्ये

Posts Tagged ‘हिंदुस्थान’

देशात स्वाइन फ्लूचे ६९ बळी

In बातमी, म. टा. खास, स्वाइन फ्लू on ऑगस्ट 25, 2009 at 12:48 सकाळी

म. टा. खास– स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराने देशात ७१ जणांचा बळी घेतला आहे. पुण्यातल्या स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या २३ झाली तर मुंबईत आतापर्यंत स्वाइन फ्लूने आठ जणांचा बळी घेतला आहे. मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पुष्पा चौधरी या गर्भवतीचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाला आहे. ठाणे येथे राहाणा-या पुष्पा यांना स्वाइन फ्लू झाल्याचे लक्षात येताच कस्तुरबामध्ये दाखल करण्यात आले होते. Read the rest of this entry »

पुन्हा दहशतवादी हल्ल्याची भीती

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 18, 2009 at 10:28 सकाळी

म. टा. खास– मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशात मोठा हल्ला झालेला नसला तरी पाकमधील दहशतवादी संघटना पुन्हा तशा तयारीत असल्याचे ठोस पुरावे आहेत. त्यामुळे आपल्याला कमालीचे सावध रहावे लागेल, असा इशारा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिला आहे.
Read the rest of this entry »

गूगल इंडिक ट्रसलीटेराशन

In आजची वेबसाइट, गूगल, मी, मोफत, संगणक on ऑगस्ट 17, 2009 at 12:06 सकाळी
गूगल इंडिक ट्रसलीटेराशन

गूगल इंडिक ट्रसलीटेराशन

गूगल ने आणखीन एक नवीन सुविधा निर्माण केली आहे. ती सुद्धा खास मराठी भाषिकांसाठी. आता मराठीत तुम्ही कुठलाही वेब साइट ला रिप्लाय करू शकता. ही सेवा बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, नेपाली, पंजाबी, तमिळ, तेलगु, उर्दू अशा इतरही भाषेत उपलब्ध आहे. यासाठी केवळ तुम्हाला गूगल चा एक कोड तुमच्या ब्राउजर मध्ये बुक मार्क करावा लागतो. Read the rest of this entry »

पुण्यात H1N1 चा चौथा बळी

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 11, 2009 at 12:50 सकाळी

म. टा. खास– गेले दोन दिवस पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये स्वाइन फ्लूच्या H1N1 विषाणूशी नेटानं झुंज देणारे केमिस्ट संजय टिळेकर यांचा अखेर आज संध्याकाळी मृत्यू झाला. स्वाइन फ्लूमुळे झालेला पुण्यातला हा चौथा मृत्यू असून राज्यातल्या बळींची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. Read the rest of this entry »

मुंबईत ‘स्वाइन फ्लू’चा पहिला बळी, देशातला दुसरा

In म. टा. खास, स्वाइन फ्लू on ऑगस्ट 8, 2009 at 10:19 pm

म. टा. खास– संपूर्ण राज्यभर घबराट निर्माण करणा-या स्वाइन फ्लूनं पुण्यानंतर आज मुंबईत आपला दुसरा बळी घेतला. H1N1 पॉझिटिव्ह असलेल्या फमिदा पानवाला यांचं संध्याकाळी कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्या ५३ वर्षांच्या होत्या. या मृत्यूमुळे मुंबईकर चांगलेच धास्तावलेत. Read the rest of this entry »

कसाबचे घुमजाव; कबुलीजबाब देणार नाही

In सकाळ on ऑगस्ट 7, 2009 at 10:38 pm

सकाळ– मुंबईवरील हल्ल्यात पकडलेला दहशतवादी अजमल अमीर कसाबने शुक्रवारी  सकाळी  आपल्यावरील सर्व आरोप मान्य असल्याचे न्यायालयात सांगितले. मात्र, अल्पावधीतच घुमजाव करीत त्याने नव्याने कोणताही कबुलीजबाब देणार नसल्याचे न्यायालयापुढे सांगितले. कसाबच्या या घुमजावमुळे त्याच्यावरील खटल्याच्या सुनावणी सुरू राहणार आहे.

Read the rest of this entry »

‘अरिहंत पाणबुडी’: शस्त्रसज्जतेचा कळस !

In बातमी, म. टा. खास on जुलै 28, 2009 at 4:26 pm

म. टा. खास– २६ जुलै रोजी ‘ आयएनएस अरिहंत ‘ ही देशांतर्गत विकसित केलेली आण्विकपाणबुडी भारतीय नौदलात सामीलझाली अशाप्रकारे भारताने संरक्षणक्षेत्रात एक महत्वपूर्ण टप्पा पार केलाआहे . ‘ अरिहंत ‘ पाणबुडीचे वैशिष्ट्य म्हणजे आण्विक इंधनावर चालणारीही भारताची पहिली पाणबुडी आहे हजार टन वजनाची ही पाणबुडी ११०मीटर लांब आणि ११ मीटर रुंद आहे . ‘ अरिहंत ‘ वर १०० खलाशी आणि सैनिक राहू शकतात आणि ती एकाचवेळी ९० दिवसापर्यंत कार्यरत राहू शकते . ‘ अरिहंत ‘ ची मारक क्षमता ७००किलोमीटर एवढी आहे आण्विक इंधनावर चालणारी पाणबुडी असणारा भारत हाजगातला सहावा देश झाला आहे . Read the rest of this entry »

लंका टीमवरील हल्ल्यामागे ‘रॉ’चा हात?

In म. टा. खास on जुलै 23, 2009 at 11:46 सकाळी

म. टा. खास– लाहोरमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट टीमवर तसेच पोलिस अकादमीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे भारताच्या रॉ या गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याचे पुरावे पाकिस्तान सरकारने भारताला दिले आहेत, असे वृत्त पाकमधील डॉन या प्रख्यात दैनिकाने प्रकाशित केले आहे. Read the rest of this entry »

उत्तर महाराष्ट्रासाठी ६५०९ कोटींचे पॅकेज

In बातमी, सकाळ on जुलै 23, 2009 at 12:17 सकाळी

सकाळ– उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी सहा हजार ५०९ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक बुधवारी नाशिकमध्ये झाली. त्यामध्ये या पॅकेजची घोषणा करण्यात आली. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर नाशिकच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. जाहीर करण्यात आलेल्या एकूण पॅकेजपैकी २००९-१० या आर्थिक वर्षात दोन हजार ८५ कोटी रुपये, २०१०-११ या आर्थिक वर्षात दोन हजार १७९ कोटी रुपये आणि २०११-१२ या आर्थिक वर्षात दोन हजार ७४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. Read the rest of this entry »

डॉ. कलाम येणार बॉलिवुडमध्ये

In म. टा. खास on जुलै 20, 2009 at 10:34 pm

म. टा. खास– हॉलिवूडमधील अभिनेत्यांना अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होण्याची मनात इच्छा असते. त्यापैकी रोनाल्ड रेगन यांची इच्छा पूर्ण झाली आणि मॅचोमॅन अरनॉल्ड स्वॉझनेगरनेही व्हाइट हाऊसमध्ये जाण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, बॉलिवूडमध्ये आता माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम आपली कमाल दाखवणार आहे. मै कलाम हूँ असे या चित्रपटाचे नाव असून त्यात कलाम हे डॉ.कलाम म्हणूनच पडद्यावर दिसणार आहेत.

Read the rest of this entry »